कामोठे वसाहतीमधील समस्या सोडविण्याची सिडकोकडे मागणी

पनवेल : वार्ताहर

कामोठे वसाहतीतील पथदिवे बंद असल्याने ते सुरू करावेत, तसेच दुभाजकावरील झाडे सुकली असल्याने त्यांना नवजीवन द्यावे, अशी मागणी कामोठकरांकडून सिडको प्रशासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षानेही यापूर्वी कामोठे वसाहतीतील समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी सिडकोकडे पत्र देऊन केली आहे.

कामोठे वसाहतीतील पथदिवे बंद असल्याने प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर अंधार पसरल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वारंवार सांगूनही सिडकोकडून दिवे लावले जात नाहीत. अंधारामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कामोठे वसाहत ही सिडकोनिर्मित आहे. पाणी, रस्ते, गटारे, रात्रीचे प्रकाशमय पथदिवे वसाहतीसाठी सिडकोकडून सुविधा देणे अपेक्षित आहे, मात्र मुख्य रस्त्यासह, अंतर्गत रस्ते, वसाहतीतील सिडकोकडून बसवण्यात आलेले पथदिवे दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत.

सेक्टर 21 मधील पथदिवे बंद असल्यामुळे वसाहतीत अंधार पसरला आहे. रात्री महिलांना घराबाहेर पडण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले अंधारात बाहेर पडता न आल्यामुळे अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना अंधारातून ये-जा करावी. लागत आहे. त्यामुळे महिला-तरुणींना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

कामोठे सिडको वसाहतीतील रस्त्याच्या दुभाजकावर सिडकोकडून झाडे लावण्यात आल्याने परिसर हिरवागार दिसायचा. मात्र गेल्या महिन्यापासून दुभाजकावरील झाडे पाण्याविना सुकू लागली आहेत. सिडकोकडे पाण्यासाठी टँकर असूनदेखील या झाडांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सिडकोने झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी कामोठेकरांकडून केली जात आहे.

सिडको वसाहतीतील रस्ते त्याचबरोबर अंतर्गत सुविधा सिडकोकडून पुरवल्या जातात. रस्त्यांचे डांबरीकरण करून दुभाजकावर झाडे लावण्यात आली आहेत. यासाठी सिडकोकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. कामोठे शहर प्रवेशद्वार ते मानसरोवर स्टेशन रस्त्यावरील दुभाजकातील झाडे पाण्याविना सुकू लागली आहेत. झाडांना पाणी मिळत नसल्याने बहुतांश झाडे सुकली आहेत.

Check Also

Пинко казино: Азартные игры или развлечение?

Пинко казино: Азартные игры или развлечение? Вопрос о том, является ли Пинко казино азартной игрой …

Leave a Reply