Breaking News

पनवेल महानगरपालिकेतर्फे महाडमध्ये स्वच्छता अभियान

पनवेल : वार्ताहर

महाडकरांवर ओढवलेल्या संकटातून राज्यातील सर्वच स्तरातून मदतीचा ओघ महाड पूरग्रस्तांना सुरू आहे. सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक महाडग्रस्तांना मदतीचा हात देत आहेत, मात्र सध्याच्या घडीला महाडमध्ये अस्वच्छता, ठिकठिकाणी पुराच्या पाण्याने वाहुन आलेली माती, मृत पावलेल्या प्राणी आदी पहावयास मिळत असल्याने या स्वच्छतेसाठी रायगड जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छतादूत पुढे सरसावले आहेत. 

महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण महाडमध्ये जवळजवळ 135 स्वच्छता कर्मचारी शहरात साफसफाई करीत आहेत. आयुक्त गणेश देशमूख यांच्यासह उपायुक्त सचिन पवार हे रस्तावर उतरून पालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांना योग्य त्या सुचना देत आहेत. महाडमधील नागरिकांना मदतीसह याठिकाणी स्वच्छतेची नितांत गरज आहे. वेळेत स्वच्छता न झाल्यास रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाच्या सुचनेवरून पालिका आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार हे स्वतः रस्तावर उतरून शहरातील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत आहेत. शेकडो टन कचरा या सफाई कर्मचार्‍यांनी स्वच्छ करून त्याची योग्य विल्हेवाट लावली आहे.

याकरिता 135 कर्मचार्‍यांसह, दोन जेसीबी, चार डंपर, सहा फवारणी मशीन, तीन स्प्रेयिंग मशीन, एक जेटिंग मशीन, दोन अग्निशमन मशीन, 10 हजार बिस्कुट पुडे, 10 हजार पाण्याच्या बॉटल्स, 800 किलो जंतुनाशक पावडर आदींचा समावेश आहे. मागील आठवडाभरापासुन ही स्वच्छता मोहीम सुरू आहे. याकरिता पालिकेचे स्वच्छतादूतदेखील मनापासुन या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply