Breaking News

सीकेटी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन

पनवेल ः प्रतिनिधी : सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमात शुक्रवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ योग अ‍ॅण्ड आयुर्वेदतर्फे विद्यालयात विशेष योगशिक्षिका नयना म्हात्रे उपस्थित होत्या.  योग केंद्राच्या विद्यार्थिनी वैष्णवी जगे आणि हर्षा शिंदे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. प्रशिक्षिका नयना म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांकडून वज्रासन, पद्मासऩ, ताडासन, शशांकासन अशी विविध योगासने करून घेतली. प्रमुख पाहुण्या डॉ. कीर्ती समुद्र यांनी शाळेतील मुले ही देशाची पुढची पिढी आहे. ही पिढी सशक्त असावी याकरिता योगाभ्यास जरूरी आहे, असे सांगितले.  पर्यवेक्षिका निरजा मॅडम यांनी योग ही भारताची परंपरा असून भारतीय परंपरेमागे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो म्हणूनच शरीर आणि मनाच्या आरोग्याकरिता योगासने आवश्यक आहेत, असे सांगितले. आमच्या विद्यालयात शारीरिक शिक्षणाच्या तासिकेला विद्यार्थ्यांना योगासने शिकवली जातात. तसेच वेळोवेळी इन्स्टिट्यूट ऑफ योग अ‍ॅण्ड आयुर्वेद या संस्थेचे सहकार्य आम्हाला लाभते, असे मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी या वेळी सांगितले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply