रसायनी : प्रतिनिधी
महाड येथे आलेल्या पुरामध्ये नुकसान झालेल्या अपंग कुटुंबीयांना शासनाकडून अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही यासाठी महाड येथील बिरगाव येथे 50 अपंग कुटुंबीयांना व्हॉट्सअॅप ग्रुप लीव्ह टू गीव्ह यांच्या वतीने अन्नधान्य आणि बीयूएसएस मुंबई यांच्या वतीने कपडे, पाणी आणि दैनादिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ह्यावेळी लीव्ह टू गीव्ह ग्रुपच्या वतीने राजू वाघमारे आणि बीयूएसएस संस्थेचे रायगड सचिव गणेश म्हामनकर, जयेश कटेलिया आणि अंकुश म्हामनकर, किशोर म्हामनकर, सोनू वाघमारे आणि निशा दुबे या कार्यकर्त्यांनी वस्तूंचे वाटप करून अपंगांना दिलासा दिला. ही मदत लाडीवली रसायनी यांच्याकडून दिलेली आहे.