Breaking News

सत्तेच्या सिंहासनावर मोदीच बसणार

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता चांगलाच रंगात आलाय, सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेचे सिंहासन कोण पटकाविणार याविषयी तर्कवितर्कही सुरू झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच या सत्तेच्या सिंहासनावर पुन्हा विराजमान होण्याचा अंदाज अनेक राजनीतिकारांनी व्यक्त केलेला आहे. त्याचा हा गोषवारा…

सन 2014च्या भारतीय, सन 2016 च्या अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये, तसेच नुकत्याच झालेल्या पंजाब व उत्तर प्रदेश राज्यांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोण विजयी होईल याचा अंदाज वर्तविणार्‍या व्यक्तीकडून सन 2019च्या निवडणुकीत सिंहासनावर कोण विराजमान होईल याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

विश्वातील 10 मुख्य कार्यकारी अधिकारी, सायबर सिक्युरिटी, माहिती व तंत्रज्ञानातील तज्ज्ञ, डाटा साईन्टीस्ट, रणनीतिकार, सल्लागार यांच्या प्रमाणेच  गौरव प्रधान हे स्वयंसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. राजकीय भवितव्याचा अचूक अंदाज वर्तविण्यामधील हातखंडा यामध्ये श्री प्रधान हे स्वतः एक ब्रॅन्ड आहेत. ते काही सर्जन किंवा संख्याशास्त्रज्ञ नाहीत तथापि माहिती व जनमानसाचा कल यावर त्यांचे अंदाज अवलंबून असतात. ट्रेस्कॉन तर्फे मुंबई येथे आयोजित वर्ल्ड एआयशो मध्ये एंटरप्रिन्युअर इंडिया मॅगझिनने माहितीशास्त्रज्ञ गौरव प्रधान यांची बहुचर्चित निवडणूक प्रक्रियेबाबत बातचीत केली.

निवडणूक 2019; कोण सिंहासन धारण करेल?

कमी जनाधार व लोकांची नाराजी यामुळे भाजपचा पराजय होईल, असा विचार करणार्‍यांनी हे ऐकायला हवे. जे अशा प्रकारची भाषा बोलतात ते एक तर मध्यमवर्गीय किंवा कर वाचविणारे व आता भरावे लागणारे लघुउद्योजक आहेत. आता ग्रामीण भारतातील संचित माहिती पाहा.

स्वयंपाकाचा गॅस व वीज यांचा सहज पुरवठा यामुळे किती कुटुंबांना लाभ झाला, किती जणांना शौचालये उपलब्ध झाली व किती बालके शाळेत जाऊ लागली. जेव्हा मी याचा अभ्यास करतो तेव्हा हा आकडा 40 कोटीच्या आसपास येतो. त्याचे मी दोन भाग करतो, पत्येकी 20 कोटी. आपणांस माहिती आहेच सन 2014 ची निवडणूक 1.4 कोटी मताच्या कमी फरकाने जिंकली होती. आता यापेक्षा मोठी लाट आहे. त्यामुळे सन 2019ची निवडणूक मोदींची आहे असे माझे गणित आहे.

आपण हे लक्षात घेतले आहे का, पंतप्रधान मोदी प्रत्येक काही दिवसांत एक किंवा अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करीत आहेत. तेसुद्धा देशाच्या विविध भागात. गुगल सर्चवर ‘मोदी उद्घाटन’ असा सर्च टाकल्यास तुम्हाला खाली नमूद केलेले अद्भूत परिणाम मिळतील. थोडक्यात, हे सरकार दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्प पूर्ण करीत आहेत व नवीन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करीत आहेत.

‘मानवी मनाच्या कलावर आधारीत निवडणुकीचा अंदाज’

विविध प्रकारच्या सोशल मीडियावरील जनतेची क्रिया प्रतिक्रिया यावर हे अवलंबून असते, त्यानंतर बौद्धिक माहिती व वैश्विक शास्त्र (जिओपॉलिटीक्स) येते. त्यामुळे पाकिस्तान व सौदी अरेबिया यांना हिलरी क्लिटंन हव्या आहेत याचा अर्थ ही राष्ट्रे ट्रम्प यांच्याकडे झुकतात असा खुलासा प्रधान यांनी केला. सन 2014 मध्ये युवा पिढी अंतः प्रवाह होती. सर्व स्तरावरील भ्रष्टाचार व आर्थिक घोटाळे यामुळे जनता त्रस्त होती. त्या सुमारास मी किंवा माझे आजोबा यांसारखा अनुभवी मतदार महत्त्वाचा घटक नव्हता. भविष्यकाळाच्या बदलासाठी युवा मतदार इच्छुक होता. या घटकाचा व राष्ट्रभक्तीच्या मुद्द्याचा फायदा नरेंद्र मोदी यांनी उठवला. मागील निवडणुकीमध्ये राजकीय पक्षापेक्षा नेता केंद्रबिंदू होता.त्याचप्रमाणे सन 2019च्या निवडणुकीमध्ये नेता केंद्रबिंदू असेल. अनुभवी मतदार राजकीय पक्षासंदर्भात चर्चा करणे उचित ठरवितात, तर युवा मतदार हा आघाडीवरील नेता कोण यावर लक्ष केंद्रित करतात असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सन 2016ची अमेरिकन निवडणूक; कदापि ट्रम्प विरुद्ध हिलरी नव्हती.

बहुसंख्याच्या मते सन 2016ची अमेरिकन निवडणूक ट्रम्प विरुद्ध हिलरी आहे असे होते, तथापि प्रधानांच्या मते नेहमीच श्री. क्लिटंन विरुद्ध श्रीमती क्लिटंन अशी होती. हे विधान कदाचित अ‍ॅबरंट असेल, परंतु वस्तुस्थिती नाही.

हे पाहा ट्रम्प धनिक आहेत, श्रीमती क्लिटंन त्यांच्या एवढ्या नाहीत, तिला स्वतःसाठी पैसे मिळवायचे आहेत. दुसरीकडे श्री ट्रम्प हे अमेरिकेसाठी पैसे मिळवू इच्छितात. राष्ट्रवाद उंचावत होता, प्रत्येक जण आपला रोजगार जगातील इतर देशातील व्यक्तींकडून हिरावला जाईल या भीतीने अस्वस्थ होते. त्यामुळे कल राष्ट्रवादाकडे झुुकला होता, असे प्रधान म्हणाले.

पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकीची छाननी

उत्तर प्रदेशातील निवडणुकीचे निकाल लाखोंसाठी धक्कादायक होते. पंजाबची निवडणूक काँग्रेस धार्जिणी आहे असे मी जोरकसपणे लिहिले होते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील असे दर्शविणारा मी एकमेव होतो. मोदी किंवा अमित शहा व अन्य कुणीही असा अंदाज काढला नव्हता. मी माझ्या पदर खर्चाने 12500 किलोमीटर वाहन चालविले. मी लहान गावातील समुदायाकडून माहिती गोळा केली व 300 पेक्षा अधिक जागांचा अंदाज वर्तविणारे एक टिपण तयार केले. प्रत्येकाने ही गोष्ट हसण्यावारी नेली, पण प्रत्यक्षात काय घडले, खरं तर सन 2015 साली योगी अदित्यनाथ मुख्यमंत्री होतील अशी टीप लिहिली. ती आहे त्याच जागी आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झालेली कामे

1) आसाममधील बोगीबिल रेल्वे पूल देशामधील सर्वात मोठा रेल्वे व रस्ता पूल सन 2002 मध्ये सुरू तथापि सन 2015 पर्यंत प्रलंबित. 25 डिसेंबर 2018 रोजी कार्यान्वित.

2) सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद महामार्ग महाराष्ट्र. सन 2014 मध्ये सुरू व 9 जानेवारी 2019 मध्ये पूर्ण.

3) अंतर्गत जलवाहतुकीसाठी वाराणसी मल्टीमोडल बंदर प्रकल्प ऑगस्ट 2016 मध्ये सुरू व 12 नोव्हेंबर 2018 मध्ये पूर्ण.

4) पूर्वीय परिधीय महामार्ग हरियाणा सरकारतर्फे सन 2015 उद्घाटन तथापि नोव्हेंबर 2018 मध्ये पुनः उद्घाटन.

5) पश्चिमीय परिधीय महामार्ग हरियाणा सरकार तर्फे सन 2006 मध्ये सुरू तथापि सन 2016 पर्यंत स्थगित, नोव्हेंबर 2018 मध्ये उद्घाटन.

6) हरियाणामधील भारतातील मोठे कॅन्सर हॉस्पिटल 18 डिसेंबर 2018 मध्ये सुरू. तीन वर्षात पूर्ण.

7) केरळ मधील 13.5 किमीचा कोल्लंम बायपास सन 1972 मध्ये भूमिपूजन, 2015 पर्यंत 4.5 किमी काम पूर्ण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते जानेवारी 2019 मध्ये उद्घाटन.

8) वैष्णोदेवी भाविकांकरिता भवन भैरो प्रवासी रोपवे प्रकल्पाचे उद्घाटन. 25 डिसेंबर 2018 

9) सिक्कीम मधील विमानतळ 2008 प्रथम उद्घाटन तथापि ग्रामस्थांच्या विरोधामुळे 2014 पर्यंत काम स्थगित 24/09/2018 रोजी काम पूर्ण.

10) काश्मीरमधील 300 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प  सन 2007 मध्ये सुरू व 2016 मध्ये पूर्ण होण्याचे उदिष्ट. पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्यामुळे काम स्थगित सन 2014 मध्ये कामास पुन्हा सुरुवात व 19 मे 2018 रोजी काम पूर्ण.

11) नमामी गंगा प्रकल्पांतर्गत प्रयागराज येथे रुपये 199.65 कोटी च्या घनकचरा पायाभूत सुविधा प्रकल्प 17 डिसेंबर 2018.

12) ओदिशा राज्यातील झारसागुडा विमानतळ प्रकल्प, सन 2013 मध्ये सुरू, सप्टेंबर 2018 मध्ये पूर्ण

13) गुजरात राज्यातील मुंद्रा एलएनजी टर्मिनल, सन 2015 मध्ये सुरू व सप्टेंबर 2018 मध्ये पूर्ण.

14) कोटा चंबळ पूल सन 2006 मध्ये सुरू तथापि पर्यावरण मंजुरीसाठी सन 2007 पासून सुरू, सन 2012 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा तथापि मे 2017 मध्ये प्रत्यक्षात पूर्ण.

15) बनसागर कालवा प्रकल्प मिर्जापूरमध्ये प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी व बांधकामासाठी करार. सन 1978 मध्ये काम सुरू, पंतप्रधान मोदींच्या हस्ते जुलै 2018 मध्ये उद्घाटन.

तरी कृपया तटस्थ आणि घराणेवादी प्रेमळ मित्रांना विचारा आतापर्यंत राज्य करीत असलेली ही घराणी काय करीत होती. जे 4.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले सरकार अंमलात/अस्तित्वात आणू शकते ते त्यांना का शक्य झाले नाही. याला विकास असे म्हणतात. ज्यामुळे भारत एक विकसित देश बनवेल. धूळ किंवा धर्मनिरपेक्षता नव्हे.

-गौरव प्रधान, ज्येष्ठ पत्रकार

साभार- एंटरप्रिन्युअर इंडिया मॅगझिन

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply