Breaking News

रायगडात 109 नवे कोरोना पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आला असून, रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. सोमवारी (दि. 26) नव्या 109 रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 233 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 72 व ग्रामीण 13) तालुक्यातील 85, खालापूर नऊ, उरण व अलिबाग प्रत्येकी चार, पेण तीन, महाड दोन आणि मुरूड व रोहा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात चार आणि रोहा तालुक्यात एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 53,318 आणि मृतांची संख्या 1530 झाली आहे. आतापर्यंत 50,183 जण कोरोनामुक्त झाल्याने 1605 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply