Breaking News

भातपिकावर बगळा रोगाचा प्रादूर्भाव; शेती धोक्यात

कर्जत : बातमीदार

जुलै महिन्यात कर्जत तालुक्यातील 900 हेक्टर भाताच्या शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यातून शेतकरी आधीच संकटात सापडला असताना आता भाताच्या पिकावर बगळा रोगाने शिरकाव केला आहे.त्यामुळे तालुक्यातील अर्ध्या भागातील भाताचे पीक बगाला रोगाने ग्रासले आहे.

कर्जत तालुक्यातील भाताचे पीक जुलै महिन्यात आलेल्या महापुरात माती दगड शेतात घुसून नुकसान झाले आहे. साधारण 900 हेक्टर जमिनीमध्ये असलेल्या भाताच्या पिकात महापुराच्या पाण्यासोबत माती घुसल्याने भाताचे पीक मातीत गाडले गेले आहे. त्याच वेळी महापुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणावर बांध बंदिस्ती मोडून गेली असून पावसाच्या पाण्यासोबत बांध बंदिस्तीची मातीदेखील शेतात वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी त्यातून सावरत असताना गेले 15 दिवस पावसाने मारलेली दडी यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडू लागला आहे. पावसाने दडी मारल्याने भाताच्या पिकावर बगळा रोगाने शिरकाव केला आहे. नेरळपासून कशेळे आणि पुढे खांडस, तसेच कळंब पासून ठाणे जिल्हा हद्दीपर्यंत असलेल्या भाताच्या पिकावर बगळा रोग पडलेला दिसून येत आहे.

या रोगामुळे भाताचे पीक कीटकनाशकांनी अर्धवट खाऊन टाकले आहेत. त्यात हे कीटक या शेतातून त्या शेतात आपला प्रवास करीत असल्याने कळंबपासून नेरळ आणि वांगणीपर्यंत भागात मोठ्या बगळा रोगाने भाताचे शेतात उभे असलेले हिरवेगार पीक पांढर्‍या रंगाचे होऊ लागले आहेत.

शेतात उभे असलेल्या पिकावर काही ठिकाणी तुडतुड्या रोगाचा देखील प्रादूर्भाव झाला असून भाताच्या लोम्ब्या मध्येच लाल होऊन भाताचे पीक करपून जात आहेत.त्यावर उपाययोजना म्हणून कीटकनाशक यांची फवारणी करण्याची सूचना कर्जत भात संशोधन केंद्राचे संशोधक यांनी आवाहन केले आहे.

शेतकरी वर्गाने बगळा किंवा अन्य कोणत्याही रोगाचा प्रादूर्भाव झाला असेल, तर शेतात भरपूर पाणीसाठा करण्यासाठी बांध बांधून घ्यावेत. त्यात कीटकांना किंवा किडींना शेतातून घालवण्यासाठी शेतकर्‍यांनी बांबूच्या काठीने किंवा दोरी भाताच्या पिकावरून फिरवावी जेणेकरून भातावर असलेल्या किडी शेतातील पाण्यात पडतील आणि त्यांच्यापासून भाताच्या पिकाची मुक्तता होईल.

-शशिकांत मोहिते, प्रगत शेतकरी

कीडग्रस्त शेतातील बांध बांधून घ्यावा, पाण्यात 50 मिली रॉकेल टाकावे. पाण्यावर तवंग निर्माण होईल. त्यानंतर घरातील दोरी पिकातून आडवी ओढत न्यावी. त्यामुळे त्या अळ्या पाण्यात पडतील. त्यानंतर बांध फोडून पाणी सोडावे. ज्या ठिकाणी बांध फोडणार त्या ठिकाणी मच्छरदाणीसारखी जाळी आधी बांधावी म्हणजे पाणी जाळीतून बाहेर पडेल आणि जाळ्यात अडकलेल्या अळ्या नष्ट करता येतील. हा अतिशय सोपा उपाय आहे. कारटॅप हायड्रोक्लोराईड 50% 12 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी.

-डॉ. रवींद्र मर्दाने, विस्तार शिक्षण शास्त्रद्य

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply