Breaking News

रोह्यात पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण

10 हजार 952 शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

रोहे ः प्रतिनिधी

चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे रोहा तालुक्यातील भातशेतीसह फळ व अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. पीक अंतिम टप्प्यात आले असताना चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे उरल्यासुरल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पावसामुळे रोहे तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या भात तसेच फळे व अन्य पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यात 10952  शेतकर्‍यांच्या 4148.47 हेक्टर क्षेत्रावरील भातपिकांचे, तर 19 शेतकर्‍यांच्या 2.01 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंतराव माने व तहसीलदार कविता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, कृषी व अन्य विभागाकडून रोहे तालुक्यातील भातशेती व फळबाग पिकाच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. शासनाकडून जाहीर केलेल्या नुकसानभरपाईच्या अनुषंगाने रोहे तालुक्यात भातशेतीसाठी दोन कोटी 82 लाख रुपये, तर फळबाग पिकासाठी 36 हजार रुपये नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply