Breaking News

खोपोली पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

खोपोली : प्रतिनिधी

शालोम एज्युकेशन सेंटर संचालित सोफिया शाळेच्या दिव्यांग विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शनिवारी (दि. 21) खोपोली पोलीस ठाण्यात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांना राख्या बांधल्या.

शालोम एज्युकेशन सेंटरच्या अध्यक्षा रूपा मजेठिया यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली येथे मतिमंद मुलांची शाळा सुरू आहे. तेथे 27 विद्यार्थी शिक्षण व प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी खोपोली पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी शिक्षिका साक्षी पवार, मंजू बोडके, जयकुमार म्हात्रे यांच्यासह पालक उपस्थित होते. या वेळी सहाय्यक निरीक्षक सतीश अस्वर, तसेच अजिंक्य पाटील, गायकवाड यांच्यासह अन्य पोलीस कर्मचार्‍यांना विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply