Breaking News

मनोरंजन अनलॉक 2.0ला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हातर्फे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये रंगलेल्या संगीत, नृत्य व नाटकांच्या मेजवानीने परिपूर्ण अशा मनोरंजन अनलॉक-2.0 कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रंगभूमी अनलॉक झाल्याने नागरिकांनी कार्यक्रमाचे स्वागत, तसेच आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी (दि. 22) झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सांस्कृतिक सेलचे प्रदेश अध्यक्ष तथा लातूर महापालिकेचे गटनेते शैलेश गोजमगुंडे, सहसंयोजक उमेश घळसाथी, प्रदेश सदस्य सुजित सिन्हा, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, श्यामनाथ पुंडे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, चिन्मय समेळ, सांस्कृतिक सेलचे शहर सहसंयोजक गणेश जगताप, संजीव कुलकर्णी, अमोल खेर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रबंध व नियंत्रण उपाय म्हणून पनवेल महापालिका क्षेत्र, तसेच संपूर्ण राज्यात खबरदारीचा उपाय म्हणून नाट्यगृह संपूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते, परंतु नुकतेच काढलेल्या परिपत्रकात 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृह सुरू करण्यात यावे, असे जाहीर करण्यात आले. (पान 2 वर..) या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने मनोरंजन अनलॉक 2.0 ः संगीत, नृत्य व नाटकांची मेजवानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नृत्य आराधना कलानिकेतन ग्रुप, आदई आणि स्टार प्लसवरील डान्स प्लस 5 फेम पनवेलकर्स ग्रुप यांनी नृत्य सादर केली, तसेच सामगंध ग्रुप पनवेल यांच्या गाण्यांची सुरेल मैफल रंगली. त्यानंतर अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे विजेते कलांश थिएटर, रत्नागिरीतर्फे ‘बारस’ हे धमाल विनोदी नाटक सादर झाले. या सर्व मनोरंजनात्मक कार्यक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद देत आयोजकांचे आभार मानले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply