पनवेल : बातमीदार
जागतिक महिला दिनानिमित्त सीआरपीएफ कॅम्प खारघर मुंबई, अखिल भारतीय स्त्री रोगतज्ञ संघटना, अखिल महाराष्ट्र स्त्री रोगतज्ञ संघटना, नवी मुंबई स्त्री रोगतज्ञ संघटना, रायगड स्त्री रोगतज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सीआरपीएफ पोलीस पत्नी व महिला पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्याकरिता कर्करोग निदान व जनजागृती शिबिराचे आयोजन सीआरपीएफ खारघर येथे बुधवारी (दि. 11) केले आहे. या शिबिरासाठी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, हॉस्पिटल नवी मुंबई पनवेल, आयएससीसीपी, रोटरी क्लब मिलेनियम सिटी नवी मुंबई, रोटरी क्लब न्यू बॉम्बे, सीसाईड रोटरी क्लब नवी मुंबई, गरिमा रोटरी क्लब नवी मुंबई, सनराईझ रोटरी क्लब नवी मुंबई (रोटरी स्मार्ट इअर 2019-2020) या संस्थानी सहकार्य केलेले आहे.