पनवेल ः रामप्रहर वृत्त
दीपावलीचे औचित्य साधून कोशिश फाऊंडेशनच्या वतीने पोस्टर स्पर्धा तसेच ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या दोन्ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांसाठी आहेत. 7 वर्षाखालील, 8 ते 15 वर्षे, 16 ते 21 वर्षे आणि 22 वर्षावरील अशा चार गटांत या स्पर्धा होणार असून ’ध्वनी प्रदूषण’, ’ये दिवाली शांतीवाली’ आणि ’वोकल फॉर लोकल’ हे तीन विषय या स्पर्धेसाठी आहेत.
स्पर्धेत नावनोंदणीची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर असून अधिक माहितीसाठी 7757000000 या क्रमांकावर संपर्क साधावा. पोस्टर स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 35 हजार तसेच ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेतील एकूण विजेत्यांना 35 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार येणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे सभागृह नेते आणि कोशिश फाऊंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …