Breaking News

उरणमध्ये एसटी कर्मचार्यांचा लढा

व्यथा जाणून घेत आमदार महेश बालदींचा पाठिंबा

उरण : वार्ताहर

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमधील एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. यात उरणमध्यही कर्मचार्‍यांनी (मुंबई विभाग) गुरुवार (दि. 4) पासून उरण आगारासमोर लढा उभारलाय. या लढ्यात सुमारे 57 ते 60 कर्मचारी सहभागी झाले आहेत. या लढ्यात आमदार महेश बालदी यांनी भेट देऊन कर्मचार्‍यांना पाठिंबा दर्शविला.

उरणमधील राज्य परिवहन कर्मचार्‍यांनी लढा उभारला आहे. यामध्ये आमदार महेश बालदी यांनी भेट दिली. त्यांनी कर्मचार्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या तसेच कोणत्याही प्रकारचा प्रवाशांना त्रास होणार नाही त्याची काळजी घ्या. उरण आगार प्रमुख सोबत चर्चा  केली आहे. आपण तुम्हाला मदत करू, असे सांगून पाठिंबा दर्शविला.

या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, हितेश शाह, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, माजी नगरसेवक राजेश कोळी व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply