पनवेल : वार्ताहर
तळोजा परिसरात फेज वन येथील एका फ्लॅटमध्ये कपाटामध्ये ठेवलेले सुमारे एक लाख अट्ठेचाळीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरी करणार्या आरोपींचा शोध सुरू केला आहे.
तळोजा वसाहतीतील कामधेनु बिल्डींग फेज वन येथील एक 60 वर्षीय महिलेने सुमारे 19 ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या बनविल्या होत्या. त्या बांगड्या घरातील कपाटामध्ये ठेवले होत्या. दिवाळीनिमिताने घरामध्ये रंगरंगोटी करण्याचे काम सुरू होते. या वेळी काम करणारे अनेक कामगार यांच्या घरात काम करून गेले होते. हे काम सुरू असताना घरातील सर्वजण दुसर्या रूममध्ये होते. त्यानंतर धनत्रयोदशी दिवशी महिलेला तिच्या कपाटामध्ये बांगड्या आढळत्यच नाहीत. त्या महिलेने पूर्ण घराची झडती घेतली, मात्र बांगड्या सापडल्या नाहीत. त्यामुळे बांगड्या व हातातील घड्याळ चोरीला गेल्याचे लक्षात येताच तळोजा पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी चोरी करणार्यांचा शोध सुरू केला आहे.