उरण ः प्रतिनिधी
उरण तहसीलदार यांच्या कार्यालयात गॅस एजन्सीचे प्रतिनिधी तहसीलदार उरण आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकार्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत उरण परिसरातील एचपीबीपी कंपनीच्या गॅससिलिंडर संदर्भात असणार्या ग्राहकांच्या तक्रारींबाबत चर्चा
करण्यात आली.
यावेळी उरणमधील गॅस सिलिंडर धारकांनी शिवसेनेच्या ग्राहक तक्रार संरक्षण कक्षाकडे केलेल्या अनेक तक्रारींचा उहापोह या बैठकीत करण्यात आला. चर्चेनंतर परिस्थितीवर तोडगा काढून ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात आले. यावेळी गॅस एजन्सीकडून ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा वेळेवर करण्यात येईल व तक्रारीकडे लक्ष देण्यात येईल, असे आश्वासन एजन्सीच्या प्रतिनिधीनी दिले. या बैठकीस शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, महिला उपजिल्हा संघटक ममता पाटील, तालुका महिला संघटक रंजना तांडेल, पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, कक्ष कार्यालयप्रमुख गजानन माळी, कक्ष उपतालुका प्रमुख धीरज बुंदे, कक्ष शहरप्रमुख संदिप जाधव, पंकज सुतार, उपकक्षप्रमुख शशांक ठाकूर, संग्राम ठाकूर, शहरसंघटक विणा तरलेजा, मेघा मेश्री, वंदना पवार, श्रद्धा सावंत, यांच्यासह नायब तहसिलदार, पुरवठा अधिकारी आणि उरणमधील एचपीबीपी एजन्सीचे प्रतिनिधी व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.