Breaking News

‘अंतरनाद’ची दिवाळी पहाट

कर्जतमधील रसिक श्रोते मंत्रमुग्ध

कर्जत : प्रतिनिधी

’अंतरनाद’ या संस्थेच्या वतीने कर्जत श्रीराम पुला नजीकच्या श्री गणपती मंदिराच्या सभागृहात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प. बबन भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या काकड आरती नंतर या संगीत मैफिलीचा शुभारंभ करण्यात आला.

या मैफिलीत गाईए गणपती जगवंदन…, प्रभाती सूर नभी रंगती…, माझे माहेर पंढरी…, अमृताहूनी गोड नाम तुझे देवा…, कानडा राजा पंढरीचा…,  गगन सदन तेजोमय…, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर…, टाळी वाजवावी गुढी उभारावी…, शालू रंगाने भिजला…, प्रभाती सूर नभी रंगती…, अवघा रंग एक झाला… अशी एकापेक्षा एक सरस गीते गायिका सुचिता शिंदे व सचिन केलटकर यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना तबल्यावर धनंजय बेडेकर तर संवादिनीवर दीपक करोडे यांनी साथसंगत दिली. नगरसेवक नितीन सावंत, भाऊ केलटकर, प्रसाद पाटील, विजय बेडेकर, दिगंबर कांबळे, ईश्वर आरेकर, रवींद्र मुधोळकर , गौतम वैद्य, सुरेश भोईर, समीर हरपुडे यांच्यासह रसिक श्रोत उपस्थित होते.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply