Breaking News

भाजप दक्षिण भारत सेलची कर्जत मंडल बैठक

कर्जत : रामप्रहर वृत्त

भाजपच्या दक्षिण भारत सेलची कर्जत मंडळ बैठक मंगळवारी (दि. 23) उत्साहात झाली. कर्जत येथील संत सेवालाल नगर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी प्रामुख्याने गुलबर्गा, यादीर, वाडी, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातील तंदूर भागातील 100 हून अधिक दक्षिण भारतीय बंजारा कुटुंबे राहात आहेत.

या बैठकीला जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा निमंत्रक श्रीनिवास कोडुरू, कर्जत शहर भाजपा अध्यक्ष आणि नगरसेवक बळवंत बुमरे, जिल्हा समिती सदस्य श्रीनिवास राव, भाजप कार्यकर्ते सरस्वती चौधरी, दिनेश, कुट्टी आदी उपस्थित होते.

या बैठकीत पाण्याचे कनेक्शन, शौचालयाची सुविधा, पथदिवे, अर्धवट ड्रेनेज, ज्येष्ठ नागरिक कार्ड, बेरोजगारी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. भाजप नगरसेवक लवकरात लवकर कॉलनीला भेट देऊन उपस्थित केलेल्या समस्यांसाठी काम करतील, असे आश्वासन जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे यांनी दिले.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply