पेण : प्रतिनिधी
अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत पेणमधील आठ दुकाने फोडून पोलिसांना आवाहन दिले आहे. मात्र दुकानदारांच्या हुशारीमुळे या चोरीमध्ये चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. रविवारी (दि. 12) रात्री अज्ञात चोरट्यांनी पेणमधील आठ दुकाने फोडली. त्यापैकी गांधी मंदिर येथील डिमोलोज केक शॉपमधील 10 हजार रुपये, साईराज स्वीट अँड फरसाणमधील 800 रुपये, गावंड गोडवील इंटर प्रायझेसमधील 1100 रुपये, उत्कर्षनगर येथील रिंग रोड जनरल स्टोअर्समधील 11 हजार 500 रुपये, चिंतामण जनरल स्टोअर्स एक हजार रुपये, पेण नाक्यावरील जलाराम मेडिकल स्टोअर्समधील पाच हजार 435 रुपये, कोंबडपाडा येथील जय आईस्क्रीम पार्लर मधील एक मोबाईल व सात हजार असे एकूण 13 हजार रुपयाचा ऐवज, स्वरा कलेक्शनमधील एक हजार रुपये असे एकूण सुमारे 43 हजार 900 रुपयांची चोरी केली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. पेण-खोपोली रोडवर भर नाक्यावर असलेली दुकाने चोरटयांनी फोडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे