Breaking News

आर्ट ऑफ लिव्हिंगचे रायगडमध्ये चैतन्य अभियान

रोहे : प्रतिनिधी

श्री. श्री. रवीशंकर गुरूदेव यांच्या आशीर्वादाने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील आठ तालुक्यात 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत रायगड पॅटर्न चैतन्य अभियान राबविण्यात आले. त्यास भरघोस प्रतिसाद लाभला. डॉ. नामदेव घोलप व उदय भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील इंदापूर, तळा, नागोठणे, कोलाड, रोहा, मुरूड, अलिबाग, पेझारी, पेण, नेरळ, कर्जत, खोपोली, पेडली, पाली येथील कोर्स केलेल्या साधकांना भेटून नवचैतन्य निर्माण करण्यात येत आहे. या सर्वच ठिकाणी ऑफलाइन नियमीत पाठपुरावा सुरू करून मकरसंक्रांत स्पेशल मेघा हॅप्पीनेस, 14 ऑनलाइन हॅप्पीनेस शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रायगड जिल्यातील सर्व साधकांनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन चैतन्य अभियान यशस्वी केले.  पुढील आठवड्यात महाड, माणगाव तालुक्यात चैतन्य अभिमान राबविण्यात येणार आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply