पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील जनतेला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले असताना निसर्ग वादळाने नुकसानग्रस्त केले आहे, अशा परिस्थितीत महावितरण कंपनीने अवास्तव विजबिले आकारणी करून ग्रामीण जनतेला पूर्णपणे नाडण्यास सुरूवात केली आहे. म्हणून पूर्ण विजबिले माफी करण्याची जोरदार मागणी करीत पोलादपूर तालुका आणि शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विजबिले जाळून आंदोलनही केले.
वाढीव विजबिलांबाबत आधी पोलादपूर महावितरणचे अभियंता सूद यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आणि तालुकाध्यक्ष प्रसन्न पालांडे यांनी चर्चा करून एक निवेदन देत संपूर्ण विजबिल माफीचे आवाहन महावितरणला केले. या वेळी पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, सरचिटणीस समीर सुतार, तुकाराम केसरकर, पद्माकर मोरे, घोसाळकर, महेश निकम, समाधान शेठ, सकपाळ, जयेश जगताप, भाई जगताप, मनोज मोरे, राजाभाऊ दीक्षित, नितीन बोरकर, सचिन मोरे, निलेश चिकणे, नामदेव शिंदे, पंकज बुटाला तसेच तालुका व शहर कार्यकारिणीचे आजी-माजी सर्व पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
म्हसळा : प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून म्हसळा तालुक्यातील नागरिकांना भरमसाठ विजबिले देण्यात आली. कोरोना महामारी व निसर्ग चक्रीवादळामुळे त्रस्त असल्यामुळे आलेली वाढीव विद्युत बिले माफ करावी याकरिता भाजपाचे वतीने तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 7) महावितरण कार्यालय म्हसळा येथे आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी भाजपाचे वतीने अध्यक्ष प्रकाश रायकर यानी मराविवि कंपनीचे उप-कार्यकारी अभियंता सतीश वानखेडे यांना निवेदन दिले, वानखेडे यानी योग्य अभ्यास करून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. वानखेडे यांनीआंदोलकांना या बिलाबाबत सविस्तर माहिती दिली विद्युत बिल कमी करण्यास तालुक्यातील नागरिक आले तर त्यांच्या समस्या दूर करण्याचे काम केले जाईल. ग्राहकांना विद्युत बिल हे काही हफ्त्यामध्ये भरण्याची सवलत देण्यात आली असून ही बाब अन्यायकारक असून ही वाढीव विद्युत बिल पूर्णतः माफ करण्यासाठी महावितरणाने अदा केलेल्या विद्युत बिलाची या वेळी होळी करण्यात आली. अशाप्रकारचे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात आल्याचे तालुका अध्यक्ष रायकर यानी सांगतले.
या वेळी आंदोलकानी महाविकास आघाडीच्या फसव्या सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. हे विद्युत बिल पूर्णतः माफ करण्यात आले नाही तर तालुक्यातील सर्व जनतेला घेऊन मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करू या आंदोलनात तालुका सरचिटणीस महेश पाटील, तालुका सरचिटणीस सुनील शिंदे, तालुका उपाध्यक्ष अनिल टिंगरे, माजी तालुका अध्यक्ष शैलेश पटेल, जिल्हा चिटणीस तुकाराम पाटील, तालुका उपाध्यक्ष यशवंत म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष दुर्जनसिंग राजपूत, खजिनदार जब्बरसिंग राजपूत, सुनिल विचारे, मनोहर जाधव, तालुका अध्यक्ष ओबीसी मोर्चा राजेंद्र चव्हाण, कामगार सेल तालुका अध्यक्ष अनंत कांबळे, किसान मोर्चाचे किशोर गुलगुले, भालचंद्र करड़े, मुकेश आंबेकर, रघुनाथ भायदे, सुनिल पाटील, सुबोध पाटील, अनंता पाटील आदी उपस्थित होते.
श्रीवर्धन : प्रतिनिधी- – भारतीय जनता पक्ष श्रीवर्धन तालुक्याच्या वतीने दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या कार्यालयावर वीज बिल दरवाढीविरोधात व महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी वारंवार खंडित होणार्या वीज पुरवठ्याबाबत महावितरणच्या अभियंत्यांचे लक्ष वेधण्यात आले.
महावितरणचे सहाय्यक उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैंजण यांना विज बिल माफ करावे, असे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना शहर अध्यक्ष शैलेष खापणकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अॅड. जयदीप तांबुटकर, सरपंच दिनेश चोगले,आशुतोष पाटिल, अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष भारत जाधव, मनोज जाधव, मनीषा श्रीवर्धनकर, किशोर भोईनकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.