Breaking News

माणगावातील शिबिरात 48 मुलांची नेत्र तपासणी

माणगाव : प्रतिनिधी

येथील जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटीच्या टिकमभाई मेथा महाविद्यालयात शनिवारी (दि. 11)  स्वदेश फाउंडेशन, एच. व्ही. फाउंडेशन आणि टिकमभाई मेथा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात 48 मुलांची  नेत्र तपासणी करण्यात आली. मेथा महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व डीएलएलइ यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात माणगाव, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन व महाड येथून आलेल्या 0 ते 18 वयोगटातील एकूण 48 मुलांची डॉ. हिमाली, डॉ. प्रियांका, डॉ. सुरुची व डॉ. शरीन यांनी अत्याधुनिक मशीनद्वारे नेत्र तपासणी केली. ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांची शस्त्रक्रिया स्वदेश फाउंडेशनतर्फे केली जाणार असून काहींना चष्मे दिले जातील असे फाउंडेशनचे डॉ. वाणी यांनी सांगितले. संस्थेचे कार्यवाह नानासाहेब सावंत, विकास समितीचे अध्यक्ष रामदास पुराणिक, प्राचार्य डॉ. संध्या कुलकर्णी, प्रा. हर्षल जोशी, अमित बाकाडे आदी यावेळी उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply