Breaking News

दिल्ली येथील सोहळ्यात हर्षला तांबोळी यांना दोन पुरस्कार

पनवेल : बातमीदार

डायडम मिसेस इंडिया लेगसी 2021 या स्पर्धेत नवी मुंबई-पनवेल येथील हर्षला योगेश तांबोळी यांना पीपल चॉईस हा किताब आणि ब्युटी विथ पर्पज हा ताज असे दोन पुरस्कार मिळाले आहेत. याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. डायडम मिसेस इंडिया लेगसी ही सौंदर्य स्पर्धा दिल्ली येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातून अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. या वेळी महाराष्ट्रातून चार महिलांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. नवी मुंबई-पनवेल मधून हर्षला योगेश तांबोळी यांची या अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना होणारे मासिक त्रास आणि अडचणी याबद्दल जनजागृती करणे असा होता. हर्षला तांबोळी यांनी यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला आहे, तसेच महिलांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. स्वर्गीय नारायण लक्ष्मण तांबोळी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हर्षला तांबोळी आणि योगेश तांबोळी अनेक उपक्रम राबवत असतात. या सौंदर्य स्पर्धेसाठी हर्षला तांबोळी यांना अनेकांचा पाठिंबा मिळाला. डायडम मिसेस इंडिया लेगसी या स्पर्धेत हर्षला तांबोळी याना पीपल चॉइस हा किताब आणि ब्युटी विथ पर्पज असे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply