Breaking News

किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धा; रायगडचा संघ बाद फेरीत

परभणी ः प्रतिनिधी
यजमान परभणीसह पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगली  या जिल्ह्यांच्या संघांनी 32व्या किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या दोन्ही गटांत बाद फेरी गाठली, तर सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांनी किशोरी आणि सातारा, जालना नंदुरबार, औरंगाबाद, अहमदनगर, हिंगोली व जळगाव यांनी किशोर गटात बाद फेरीत प्रवेश केला.
परभणीतील पाथरी येथील कबड्डीमहर्षी बुवा साळवी क्रीडानगरीत सुरू असलेल्या मुलींच्या इ गटात ठाण्याने रत्नागिरीला 30-28 असे चकवित या गटात अग्रक्रम पटकाविला, तर रत्नागिरीने उपविजयी होत बाद फेरी गाठली. ठाण्याकडून प्रतीक्षा सणस, गौरी मांझी, तर रत्नागिरीकडून सारा शिंदे, पूर्णा दळवी यांनी उत्कृष्ट खेळ केला. द गटात कोल्हापूरने सातार्‍याला 34-30 असे पराभूत करीत उपविजयी म्हणून बाद फेरी गाठली. रायगडने सोलापूरला 47-47 असे बरोबरीत रोखल्यामुळे या दोन्ही संघांनी बाद फेरी गाठली. फ गटात नाशिकने सिंधुदुर्गला 59-18 असे पराभूत करून या गटात अव्वल स्थान मिळवित बाद फेरी गाठली. सिंधुदुर्गदेखील उपविजयी ठरले.
मुलांच्या ड गटात नंदुरबारने मुंबई उपनगरला 45-30 असे पराभूत केले. सिद्धार्थ मुरूमकर, विश्वजित साळुंखे नंदुरबारकडून, तर भावेश चिंदरकर, अर्षद चौधरी उपनगरकडून उत्तम खेळले. इ गटात कोल्हापूरने औरंगाबादला 36-32 असे पराभूत करीत बाद फेरी गाठली. शुभम रेपे, प्रेम पाटील या विजयात चमकले. दीपक डाके, संघर्ष इंगोले छान खेळले. फ गटात अहमदनगरने सांगलीला बरोबरीत रोखत बाद फेरीतील आपला मार्ग सुकर केला. सौरभ सिरसाट, गणेश नरवडे नगरकडून, तर युनास पिरजादे, अमित फाळके सांगलीकडून उत्तम खेळले. अ गटात सातार्‍याने ठाण्याला 55-20असे नमवित या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. ब गटात पुण्याने श्रीधर कदम, यश करपे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर सिंधुदुर्गला 47-17 असे नमवले. सतीश मांजरेकर पराभूत संघाकडून उत्तम खेळला.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply