Breaking News

उरण महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई परिषद

उरण : रामप्रहर वृत्त

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने सेवाक्षेत्र ः कोरोना दरम्यान आणि कोरोना नंतरच्या काळातील आव्हाने आणि संधी या विषयावर आंतरराष्ट्रीय र्ई परिषदेचे आयोजन केले गेले.

या परिषदेत उद्घाटनीय कार्यक्रमात प्रो. डॉ. डेव्ह ओ.गोरमन (सॅन्ताफे कॉलेज फ्लोरीडा, अमेरिका) यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर कोव्हीड19 चा प्रभाव या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. मुख्य अतिथी डॉ. राजेश राजपुरकर (माजी प्र-कुलगुरू, अमरावती विद्यापीठ) यांनी शिक्षण व्यवस्थेवर कोव्हीड19 चा झालेला परिणाम या विषयी माहिती सांगितली. उपस्थितांचे स्वागत प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.व्ही.एस. इंदुलकर यांनी केले. समारंभाचे अध्यक्ष कोकण ज्ञानपीठ कर्जतचे उपाध्यक्ष शिशीर धारकर यांनी युवा भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले तसेच प्रा. के. ए. शामा यांनी सर्वांचे आभार मानले तर सुत्रसंचलन प्रा. डॉ. पराग कारूळकर यांनी केले.

व्दितीय सत्रात भारताच्या विविध राज्यातील एकुण तेरा संशोधकांनी आपले पेपर सादर केले. या सत्राचे वक्ते प्रा. डॉ. अजितकुमार (शासकीय महाविद्यालय, भिवानी, हरियाणा) हे होते तर अध्यक्ष डॉ. एलिझाबेथ मॅथ्युज हया होत्या. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा. लिफ्टन कुमारी यांनी केले तर आभार प्रा.रियाझ पठाण यांनी मानले तसेच या सत्राचे सुत्रसंचलन प्रा. हन्नत शेख यांनी केले.

तिसर्‍या सत्रात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विलास कुलकर्णी (सरदार पटेल विद्यापीठ, आनंद, गुजरात) हे होते. तर अध्यक्ष प्रा. डॉ.किशोरी भगत या होत्या. या सत्रात पाहुण्यांचे स्वागत व परिचय प्रा. मयुरी मढवी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. एम. जी.लोणे यांनी मानले. या सत्रात एकुण बारा संशोधकांनी आपले वेगवेगळ्या विषयावरील पेपर सादर केले. या परिषदेत बँकिग फायनान्स़ आरोग्य, पर्यटन, उदयोग, विमा, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व कायदेशीर सेवा इत्यादी विविध सेवा क्षेत्रावर कोव्हीड19 चा झालेला परिणामा विषयी विचारमंथन झाले.

समारोप सत्रात र्ईपरिषदेचे समन्वयक प्रा. व्ही. एस. इंदुलकर यांनी परिषदेचे पुनःरावलोकन केले. सहभागी पैकी प्रा. डॉ. अभिषेक चंडोला यांनी या परिषदेविषयीच्या भावना व्यक्त केल्या. समारोपिय सत्राचे अध्यक्ष मा. डॉ. दीपक रावेरकर (प्राचार्य, सुंदरराव मोरे महाविद्यालय, पोलादपुर) हे होते. तर संपुर्ण परिषदेचे आभार प्रा. एच. के. जगताप यांनी व्यक्त केले. परिषदेत देशाच्या विविध भागातून एकुण 53 शोध निबंध सादर केले गेले. भारताच्या 13 राज्यातून 265 विविध अभ्यासक संशोधक यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply