Friday , June 9 2023
Breaking News

हळदीकुंकू समारंभात रंगले विविध खेळ

मोहोपाडा : प्रतिनिधी

श्री शारदा अभिनव प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित यांच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन आंबिवली येथे करण्यात आले होते. या वेळी महिलांकडून संगित खुर्ची, फुगडी, नृत्य आदी विविध खेळ खेळण्यात आले. विशेष म्हणजे या खेळासाठी मोल्यवान तसेच गृहपयोगी वस्तू बक्षिस म्हणून ठेवण्यात आले होते.

आज घर सांभाळता तारेवरची कसरत करावी लागत आहे, मात्र महिला वर्ग आज शिक्षणात पुढे आहे. शिवाय कुटुंबाची सर्व जबाबदारी पार पाडत आहे. मुलांचे शिक्षण समवेत संसार सांभाळण्याचे मोठे धाडस तिच्यामध्ये निर्माण झाल्याचे दिसून येते. शिवाय कौटुंबिक जीवन जगत असतांना विविध समस्या येत असतात, मात्र त्यास न डगमगता त्या आपले काम यशस्वीपणे करत असतात, असे मार्गदर्शन संजना दळवी यांनी या समारंभात व्यक्त केले.

या वेळी श्री शारदा अभिनव प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित अध्यक्षा आश्विनी पिंगळे, उपाध्यक्ष मंदा कुरुंगळे, कार्याध्यक्षा मनिषा साळुंखे, सचिव अनघा आमले, सहसचिव संजना दळवी, खजिनदार निलम शिंदे, सहखजिनदार स्वप्नानी लभडे, सद्स्या सुषमा मुंढे, मोनिका जाधव, ज्योती बुरुमकर, समिक्षा मोरे आदी उपस्थित होत्या.

माजी उपसरपंच जया जाधव, सीआरपी कमल जाधव, बचत गटातील वर्षा जाधव, कल्याणी जाधव, मीना पाटील, अस्मिता पाटील, भाग्यश्री पाटील, शारदा जाधव, सारिका जाधव, अंजली जाधव, पद्मा जाधव, शितल जाधव, प्रियंका जाधव, मनिषा जाधव, त्याच बरोबर गावातील महिला वर्ग उपस्थित होत्या.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply