पनवेल : रामप्रहर वृत्त
तळोजा मजकूर येथील श्री कृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने माजी सरपंच संतोष पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य आमदार चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 6) झाले. या वेळी त्यांनी जोरदार फटकेबाजी करत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
स्पर्धा सेक्टर 8मधील पेठाली मैदानात 6 ते 10 जानेवारीदरम्यान रंगणार आहे. उद्घाटनावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी सरपंच संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, निर्दोष केणी, रमेश मढवी, बबन पाटील, भरत पाटील, रवी पाटील, सुनील पाटील, जयवंत घरत, नितीन पाटील, किरण पाटील, जमनालाल गुर्जर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेळाडू उपस्थित होते.
Check Also
रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …
RamPrahar – The Panvel Daily Paper