Breaking News

सीकेटी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

रसायनशास्त्र विभागाचा यशस्वी उपक्रम

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त) नुकतेच दोन दिवसीय रसायनशास्त्र विभागातर्फे रिसेन्ट इनोवेशन अ‍ॅण्ड कन्सर्न ऑफ ग्रीन केमिस्ट्री टुवर्डस सस्टॅनाबिलिटी (Recent Innovations and Concerns of Green Chemistry towards Sustainability) या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही राष्ट्रीय परिषद राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा)द्वारा पुरस्कृत होती. राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलुगुरू डॉ. ए. बी. पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या भाषणात डॉ. ए. बी. पंडित यांनी हरित रसायनशास्त्रामधील नवीन संशोधन व त्यामधील उपलब्ध संधी याबद्दल मार्गदर्शन केले. उद्घाटनानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. डी. बर्‍हाटे यांनी महाविद्यालयाची प्रगती व कार्याची थोडक्यात माहिती दिली. महाविद्यालयाचे उपप्राचार्य, रसायनशात्र विभागाचे प्रमुख आणि या राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. एस. के. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. आभार प्रदर्शन परिषदेच्या सहसमन्वयक व रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले. राष्ट्रीय परिषदेसाठी विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक, शोधकर्ता आणि विद्यार्थी मिळून 112 जण सहभागी झाले होते. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने 44 शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. त्यातील काही शोधनिबंध आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. डी. बर्‍हाटे, उपप्राचार्य व रसायनशात्र विभागाचे प्रमुख डॉ.एस. के. पाटील, सहसमन्वयक डॉ. ज्योत्स्ना ठाकूर आणि रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply