उरण : वार्ताहर – जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 17) उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे व भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह यांच्या वतीने नगर परिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा क्र. 1, 2 व 3 मधील पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. सुमारे 195 विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद्र कोळी, शिक्षण सभापती तथा भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शहा, नगरसेवक राजू ठाकूर, धनंजय कडवे, मेराज शेख, नंदकुमार लांबे, नगरसेविका यास्मिन गॅस, दमयंती म्हात्रे, आशा शेलार, जान्हवी पंडित, रजनी कोळी, स्नेहल कासारे, प्रियंका पाटील, शहर भाजप महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, शाळा क्र. 1च्या मुख्याध्यापिका भारती खेडकर, शाळा क्र. 2च्या मुख्याध्यापिका रत्ना गवळी, मोरा शाळा क्र. 3च्या मुख्याध्यापिका स्नेहा पाटील, उपशिक्षक नीलकंठ पाटील, शिक्षक किरण गावंड आदी उपस्थित होते.