शिवलिंगावरील चांदीचे आवरण चोरट्यांनी पळवले
अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील नारंगी भुवनेश्वर येथील शिवमंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. मंदिराचा दरवाजा तोडून गाभार्यात असलेल्या शिवपिंडीवरील चांदीचे आवरण चोरट्याने पळवून नेले. त्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये इतकी आहे. चोरट्यानी मंदिरातील दानपेटीदेखील फोडली. मात्र दोन दिवसांपूर्वीच विश्वस्थांनी त्यातील रक्कम काढून घेल्याने चोरट्याच्या हाती काही लागलं नाही. सकाळी ही बाब नजरेस आल्यानंतर याबाबत पोयनाड पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. सीसीटिव्ही फुटेज आणि श्वान पथकाच्या मदतीने पोलीस चोरट्याच्या शोधात आहेत.