पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे सुरू आहेत. या कामांची आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पाहणी करून कामांचा आढावा घेतला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, स्टेशन मास्तर कृष्णा अग्रवाल, आर.के. नायर, शिवाजी भोसले, अशोक आंबेकर, जरीना शेख, कविता गुप्ता, रवींद्र फास्टे हेही उपस्थित होते. अमृत भारत स्टेशन योजना (एबीएसएस) अंतर्गत प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. पनवेल रेल्वेस्थानकाचा विकास या योजनेचा एक भाग असून प्रवाशांना जास्तीत जास्त सेवा मिळाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी करत आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्यांना केल्या.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper