Breaking News

काशीद येथील खून प्रकरणातील आरोपी गजाआड

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील काशीद येथे झालेल्या हत्ये प्रकरणी मुरूड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यापैकी एकाला न्यायालयाने पोलीस कोठोडी सुनावली आहे तर दूसरा आरोपी अज्ञान असल्याने त्याची कर्जत येथील बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.

काशीद येथील एका विहिरीत काही दिवसापूर्वी  मृतदेह तरंगताना आढळला होता. वैद्यकीय तपासणीत हा खून प्रकार असल्याचे उघडकीस आल्याने मुरूड पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुरूडचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सचिन वाणी, संतोष पाटील, पोलीस नाईक सुरेश वाघमारे यांच्या पथक केवळ 24 तासात गुन्हा उघड करून आरोपीना जेरबंद करण्यात यश मिळवले. खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार  पोलिसांनी मृत व्यक्तीचा मोबाईल हुडकून काढला. त्याच्या आधारे मृत व्यक्तीचे नाव विनोद कुमार (वय 46, मूळ रा. कुंनुर, केरळ) असून तो काशीद येथील प्रकृती रिसॉर्ट येथे मसाज करण्याचे काम करीत होता, अशी माहिती मिळाली. अधिक तपासात विनोद कुमार 8 फेब्रुवारीच्या रात्री काशीद आदिवासी वाडीवर त्याच्या  मित्राकडे दारू पिण्यासाठी गेला होता, असे समजले. तेथे आरोपी गौरव नंदू वाघमारे (वय 19), मंथन महेंद्र पवार (वय 13) यांच्याबरोबर त्याचे जोरदार भांडण झाले. या दोघांनी त्याला पट्ट्याने व हाताबुक्याने मारहाण केली. मानेवर पाय देऊन त्याला ठार मारल्यानंतर आरोपी गौरव आणि मंथन यांनी विनोद कुमार याच मृतदेह सिमेंटच्या पाईपला बांधून विहिरीत ढकलून दिला.

मुरूड पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, गौरव नंदू वाघमारे याला 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरा आरोपी मंथन पवार अल्पवयीन असल्याने त्याची कर्जत येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन गवारे करीत आहेत.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply