Breaking News

एक्स्प्रेस वेवर अपघातात एक ठार, सहा जण जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी हद्दीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
द्राक्ष भरलेला टेम्पो मुंबईकडे चालला असताना त्याचा टायर निकामी झाला. त्यामुळे टेम्पोमधील तीनजण खाली उतरले असता मागून येणार्‍या प्रवासी बसने त्यातील एकाला धक्का दिला. त्यात ती व्यक्ती जागीच ठार झाली. अन्वर हुसेन (वय 51, रा. उत्तर प्रदेश) असे या व्यक्तीचे नाव आहे, तर अपघातग्रस्त बसमधील महेश निलवे, अनिता निलवे (दोघेही डोंबिवली), चंद्रकांत मोरे, वासंती शिवाजी टकेकर (दोघेही आजरा), विश्व आंद्रेकर व अश्विनी आंद्रेकर या प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply