Breaking News

भारतीय मजदूर संघाच्या वर्धापन दिनी धाटावमध्ये कामगार मेळावा उत्साहात

रोहे : प्रतिनिधी

भारतीय मजदूर संघाच्या वर्धापनदिनानिमित्त रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील आरआयसीमध्ये कामगारांचा मेळावा घेण्यात आला.

या कामगार मेळाव्यात आगामी काळामध्ये  संघटनात्मक बांधणी व संघटना वाढीबद्दल तसेच सुधारित कामगार कायद्याबद्दल चर्चा करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व युनिटने स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) ध्वजारोहण करणे यासह मुंबईत काढण्यात येणार्‍या मोर्चाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

भारतीय मजदूर संघाचे माजी उपाध्यक्ष रमेश गोविलकर, रायगड जिल्हा सचिव अशोक निकम, जिल्हा कोषाध्यक्ष संदीप मगर, विलास भगत, अजित तलाठी, निर्मला भुतकर यांच्यासह आद्योगिक क्षेत्रातील कामगार या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित होते.

Check Also

तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन

तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …

Leave a Reply