उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी
उरणमध्ये तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या प्रत्यक्षकृती दर्शक सहभागामुळे नगरपरिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात गरूडझेप स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. या अभ्यासिकेचे उद्घाटन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचा जास्तीत जास्त वापर करावा त्यातच सर्व विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य दडलेले आहे, हे उदाहरणासह पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालयाचे ग्रंथपाल संतोष पवार यांनी केले. या कार्यक्रमाला प्रसाद मांडेलकर, तहसील कार्यालयाचे सुरवाडे, उरण नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुरेश तेजी, मुकादम महेंद्र साळवी, धनेश कासारे, ग्रंथालयाचे जयेश वत्सराज यांच्यासह उरण कला व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.