Breaking News

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर यांनी केलेली मदत पनवेलची जनता कधीच विसरणार नाही, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या जरीना शेख यांनी केले. गोरगरिबांचा विचार करणारे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
जरीना शेख यांनी पनवेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना सांगितले की, कोरोना आणि त्यामुळे आलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती, मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गरीबाचा विचार करून त्यांना सर्वोत्तपरी मदत केली. कोरोना महामारीने जीव वाचवताना सर्वसामान्यांना पोटाच्या खळगीचा प्रश्न निर्माण झाला. अशा या भूतो न भविष्यतो संकटकालीन परिस्थितीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लाखो जणांना मदतीचा हात दिला. कोरोनाच्या काळात दिड लाखाहून अधिक अन्नधान्याचे किट, दिड लाखाहून अधिक व्यक्तींना अन्नछत्र, एक लाखाहून अधिक मास्क, सॅनिटायझर, औषधे, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन, आर्थिक मदत, अशी हरएक मदत गरजूंना करून कोरोना काळात नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम केले. विशेष म्हणजेच ही मदत करत असताना कोरोना म्हणजे मृत्यू अशी परिस्थिती असतानाही आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना मोठा धीर दिला होता हे सर्व जनतेने पहिले आहे. कोरोना काळाच्या आठवणी जाग्या झाल्यावर आजही अंगावर काटा येतो. ती भयानक परिस्थिती होती. एका बाजूला या आजाराची तर दुसर्‍या बाजूला पोटाची खळगी भरण्याची चिंता होती. मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रशांतदादा आणि परेशदादांना सर्वसामान्य माणसाची काळजी होती. त्यामुळे त्यांनी तळागाळात अगदी झोपड्पट्टीपर्यंत मदत पोहचवली. कोरोनाच्या पूर्वी जेव्हा महापुराचे संकट आले होते तेव्हाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अग्रेसर राहत सर्वतोपरी मदत करत या संकटातूनही लोकांना बाहेर काढले होते. त्यामुळे कोणतीही आपत्ती येवो लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, परेशदादा ठाकूर लोकांच्या मदतीला सामाजिक बांधिलकीने धावून जात असतात, त्यामुळे सुजाण नागरिक म्हणून सर्वानी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, असेही जरीना शेख यांनी नमूद केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply