पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्यात महायुतीचे सरकार हे विविध योजना राबवून त्याचा लाभ नागरिकांना देत आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणारे सरकार हे पुन्हा सत्तेत आणा आणि पनवेलमध्ये ज्या वेगाने विकासाची कामे झाली तोच विकासकामांचा झंझावात पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी येत्या 20 तारखेला विकासाची निशाणी असलेल्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठ्यात प्रचारावेळी मतदारांना केले.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. 15) कामोठे, नौपाडा आणि जुई गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती. या वेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जनतेचा लक्षणीय प्रतिसाद लाभला.
या प्रचारावेळी शिवसेनेचे पनवेल जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, पनवेल महापालिकचे माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, गोपीनाथ भगत, विकास घरत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका अरुणा भगत, कुसुम म्हात्रे, रवींद्र म्हात्रे, भाऊ भगत, प्रदीप भगत, राजेश गायकर, के.के. म्हात्रे, सुधाकर पाटील, हॅप्पी सिंग, महेंद्र भोपी, सचिन गायकवाड, हर्षवर्धन पाटील, आशा भगत, महिला मोर्चाच्या कामोठे मंडल अध्यक्षा वनिता पाटील, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …
RamPrahar – The Panvel Daily Paper