Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांचा मॉर्निंग वॉकमध्ये नागरिकांशी संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि.16) पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे मॉर्निंग वॉकच्या अनुषंगाने नागरिकांशी संवाद साधला. त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस नितीन पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, भाजपचे अमित ओझे, केदार भगत, विनायक मुंबईकर, स्वप्निल ठाकूर आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांना नवमतदार, युवा, महिलावर्गाचा पाठिंबा, तर ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभत आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे आणि सामाजिक बांधिलकीतून केलेले समाजकार्य नेहमीच लोकहिताच्या दृष्टिकोनातून प्रेरणादायी ठरले आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांचे स्वागत करून त्यांना समर्थन दिला जात आहे.

Check Also

कोकणातील वणव्यांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आक्रमक

कठोर उपाययोजना करणार -वनमंत्री गणेश नाईक पनवेल : रामप्रहर वृत्तकोकणातील आंबा व काजू बागांचे वणव्यांमुळे …

Leave a Reply