खोपोली : प्रतिनिधी
तालुक्यातील छत्तीशी भागातील गारमाळ येथील ग्रामस्थ पक्का रस्त्याच्या प्रतीक्षेत असून रस्त्याला अजूनही निधीची प्रतिक्षा आहे. नंदनपाडा ग्रामपंचायत हद्दीत गारमाळ गाव असून मुख्य रस्त्यापासून सुमारे अडीच किलोमीटर रस्त्याचे अंतर आहे. गारमाळ धनगरवाडा आणि आदिवासी बांधव आजही रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत यामुळे येथील ग्रामस्थांना अडीच किमीची पायपीट करावी लागत आहे. रुग्ण, वयोवृद्ध विद्यार्थी यांना पायपीट करावी लागत आहे. पावसाळ्यात या ठिकाणी दुचाकीही जात नसल्याने येथे कोणी आजारी पडल्यास झोळी करून रुग्णालयात न्यावे लागते. याबाबत ग्रामस्थ आणि प्रशासनाची बैठक झाली आहे. या बैठकीला नायब तहसीलदार राठोड, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, वनविभाग अधिकारी राजेंद्र पवार, आदिवासी प्रकल्प अधिकारी जगदीश भानुशाली, नियोजन अधिकारी अनंतकुमार हेमाडे, वनपाल पाटील, ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील, अभिजित पाटील, ग्रामस्थ अनंता हिरवे, नागेश हिरवे, किरण हिरवे, राम वाघमारे, चंद्रकांत आखाडे, बाबू हिरवे, विलास गोरे, दिनेश गोरे, नरेश हिरवे, बबन हिरवे,दिलीप डाके, दीपक मोरे सुभाष मोरे संदीप हिरवे आदी उपस्थित होते.
रस्त्याबाबत खालापूर तहसील आणि वनविभाग,प्रकल्प अधिकारी यांची ग्रामस्थांसोबत बैठक झाली असून या रस्त्यासाठी वनविभाग आणि खालापूर तहसील प्रशासन यांच्या सोबत बैठक होऊन सकारात्मक चर्चा झाली मात्र या रस्त्याला आता निधीची प्रतीक्षा आह.
-दत्ता शेडगे, सामाजिक कार्यकर्ता