Breaking News

पनवेल, उण एसटी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची सभा उत्साहात

पनवेल ः वार्ताहर

पनवेल-उरण एसटी सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची सभा नुकतीच पनवेल बसस्थानकात चंद्रकांत आनंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला 88 कर्मचारी उपस्थित होते. प्रथम मृत पावलेल्या कर्मचार्‍यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपाध्यक्ष एन. ए. चव्हाण यांनी, सध्या अस्तित्वात असलेली कमिटीच 2022पर्यंत कार्यरत राहिल, तसा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाबाबत बी. बी. पाटील यांनी सर्वांची मते जाणून घेतली. सेवानिवृत्त सर्व कर्मचार्‍यांनी त्या प्रस्तावास एकमताने संमती देत प्रस्ताव स्वीकारला. संघटनेचे सल्लागार अ‍ॅड. विद्याधर मोकल यांनी नवीन सभासदांची नोंदणी करून घेतली. त्यावेळी सर्वांनी एकोप्याने राहून संघटनेला सहकार्य करण्याचे ठरले. या वेळी सी. आर. काळे, एच. आर. नाईक, गिरीश ठाणगे, मधुकर शिंदे, शैला पितळे, सीमा देशमुख, के. पी. म्हात्रे, आशा विलवर्ण, येराडकर, प्रकाश लाखण, अनिल झिराडकर, ए. एम. चौधरी, एस. एस. शिंदे, एस. के. म्हात्रे, एस. बी. सावळकर, तुकाराम पाटील, के. एस. पाटील, नितीन वेदक, एकनाथ पाटील, राहुल सोनावणे आदी उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply