पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना नवीन पनवेलमधून मताधिक्य देऊन बहुमताने निवडून आणणार, असा ठाम विश्वास भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केला.
नवीन पनवेल येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सेक्टर 18 मधील सिडको विनायक मंदिरातील श्री गणेशाचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली. या वेळी माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी बोलताना सांगितले की, पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर विजयी होणे गरजेचे आहे तसेच महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवून त्यांचा लाभ सर्वसामान्य माणसाला मिळवून दिला आहे. लाडकी बहीण योजना राबवून महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे आत्ता या योजनेचे पैसे वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे गतीमान पद्धतीने काम करणारे महायुतीचे सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आणा असेही त्यांनी यावेळी सांगितले. पनवेल विधानसभा मतदार संघाचा विकास करणारे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रचारात जोरदार आघाडीत घेतली आहे. महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे संपुर्ण मतदार संघ पिंजून काढत आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. या वेळी माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, जगदीश घरत, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, जितेंद्र वाघमारे, अॅड. चंद्रकांत मढवी, गंगाधर भगत, महेश तांडेल, मयूर कदम, गिरीश खरिवले, पप्पू साळवी, अमोल भगत, पप्पू वाघमारे आदी उपस्थित होते.
Check Also
महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …
RamPrahar – The Panvel Daily Paper