Breaking News

डॉ. आंबेडकर जयंती साजरी करताना नियमांचे पालन करा

पनवेल शहर पोलिसांचे आवाहन

पनवेल : वार्ताहर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वानी उत्साहात करावी, परंतु शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत होणारे कार्यक्रम व निघणार्‍या मिरवणूकींबाबत उपस्थितांना शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांप्रमाणे मार्गदर्शन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी केले. या बैठकीत स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके यांनी सांगितले की, कोरोना काळामुळे मागील दोन वर्ष भीम सैनिकांना जयंती साजरी करता आली नाही, परंतु आता शासनाने सर्व निर्बंध दूर केल्यामुळे भीम सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे सर्व मंडळांना आंबेडकर जयंती साजरी करण्याकरीता परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली

या बैठकीला पनवेल शहरातील पंचशील नगर, नवनाथनगर,  करंजाडे, वडघर, ओवळे सह अनेक ठिकाणचे पदाधिकारी, पोलीस पाटील कुणाल लोंढे, राज सदावर्ते यांच्यासह आदी उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply