Breaking News

जासई येथील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळणार; संघर्ष समितीच्या विविध मागण्यांना यश

उरण : प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे जासई गावातील 130 घरांच्या झालेल्या दैनिय अवस्थेची सविस्तर माहिती अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. भविष्यात आमच्या गावाला पावसाच्या पाण्याचा कशा प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो. हे संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी उरण तालुक्यातील छत्रपती शिवाजी हायस्कूल जासई येथे उपस्थित अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच 130 घरांची नुकसान भरपाई देण्याचे सिडको व जेएनपीटी अधिकार्‍यांनी मान्य केले.

संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या बोलण्यात आणि जासई गावच्या ग्रामस्थांच्या बोलण्यात तथ्य असल्याची जाणीव झाल्याने उपस्थित सिडको आणि जेएनपीटीच्या अधिकारी वर्गाने त्वरित प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तयारी दर्शविली. लगेच अध्यक्ष  सुरेश पाटील आणि संघर्ष समितीचे कार्यकर्ते  यांनी जासई गावच्या पुर्व आणि पश्चिम बाजूची पाहाणी केली. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की, यासाठी ठिकाणी कायम स्वरूपी काँक्रिट नाल्यांची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले.

त्वरित सिडकोच्या व जेएनपीटीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, एक-दोन दिवसात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकां बरोबर संघर्ष समितीची बैठक आयोजित करून, या कामास प्रथम प्राधान्य देवून हे काम त्वरित सुरू करू, असे त्यांनी खात्रीपूर्वक संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील आणि कमिटीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र हे सारे गावकर्‍यांच्या एकीमुळे शक्य झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिटिंगमध्ये संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, जासई गावचे सरपंच संतोष घरत, मा. सभापती (उरण) नरेश घरत, पंचायत समिती सदस्य धीरज घरत, सुनिल घरत, मेघा म्हात्रे, सुभाष घरत, बाळाशेठ पाटील, यशवंत घरत, माणिक म्हात्रे, नामदेव पाटील व हभप धर्मदास म्हात्रे हे कमिटीचे कार्यकर्ते आणि जवळ जवळ 200 ते 300 गावकरी ह्या मिटिंगसाठी हजर होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply