माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे बैठकीत आश्वासन
पनवेल ः राम्रपहर वृत्त
उलवे नोड सेक्टर 9 येथील सोसायटीतील रहिवाशांना काही नागरी समस्या भेडसावत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रहिवाशांसोबत शनिवारी (दि. 16) बैठक झाली. या वेळी रामशेठ ठाकूर नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी रहिवाशांना दिले.
या बैठकीस गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य योगिता भगत, कामिनी कोळी, सुजाता पाटील, सुधीर ठाकूर, सुहास भगत, तिवारी यांच्यासह सोसायटीच्या चेअरमन सिना वर्गिस, सदस्य अर्चना मिश्रा आणि अन्य सदस्य, रहिवासी उपस्थित होेते.
या बैठकीत सोयसायटीतील नागरिकांनी वाहतूक व अन्य समस्या लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासमोर मांडल्या. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिले. त्याचप्रमाणे सोसायटीच्या लगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर मंदिर उभारण्याचा रहिवाशांचा मानस आहे. त्यासाठीही सहकार्य करू, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आश्वासित केले.
दरम्यान, या वेळी सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक दौलत मिराणी यांना वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या.