Breaking News

पनवेलमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

कळंबोलीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले बजरंगबलीचे दर्शन

पनवेल ः वार्ताहर

कोविड काळात गेली दोन वर्षे हनुमान जयंती उत्सव जल्लोषात साजरा झाला नव्हता, यावेळी कोविडचे बंधन नसल्याने मोठ्या जल्लोषात व उत्साहात हनुमान जन्मोत्सव लाईन आळी, श्री हनुमान मंदिरात साजरा झाला. कळंबोली शहरातील मंदिरातहील विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कक्षरण्यात आले होते.

कळंबोली येथे पहाटे पाच वाजता भाजप व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमल कोठारी यांच्या हस्ते बजरंग बळींचा महाअभिषेक करण्यात आला. दुपारी 12 ते 3 सुंदर कांड वाचन, भजन, सायंकाळी 4 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. हनुमानाच्या मिरवणूक सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक अमर पाटील, नगरसेवक बबन मुकादम, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, बबन बारगजे, महिला भाजपा नेत्या प्रिया मुकादम, संतोष मोकल यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले. शहरांसह गावातील हनुमान मंदिरांना विद्युत रोषणाई केली होती. हनुमान जयंतीनिमित्त सकाळी श्री देव हनुमंताची विधिवत पूजा-अर्चा व जन्माचा पाळणा म्हणून उत्सवाची सुरुवात झाली. तसेच संध्याकाळी मंगल वाद्य वाजवून सातारकर बंधूनी आपली सेवा केली. त्यानंतर महाआरती व रात्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ,पनवेल तर्फे सुश्राव्य भजन करण्यात आले.यावेळी सप्रेबुवा, बबन बुवा मढवी, अस्वले, रानडे बंधू, सुधाकर पाटील सारडेकर, गावंड बुवा आदी भजनी बुवांच्या वतीने भजन सेवा करण्यात आली.

यावेळी हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अनिल कुरघोडे, उपाध्यक्ष रवींद्र पडवळ, सेक्रेटरी राजेंद्र घुले, खजिनदार शेखर गायखे, पुरुषोत्तम पटवेकर, चद्रकांत घुले, अनिल टेमघरे, सुनील कुरघोडे, अभिजित चव्हाण, कुणाल कुरघोडे, राजेंद्र आमले, प्रमोद कुरघोडे, बबन मढवी, गुजराती, अशोक पडवळ,आदी देवस्थानचे विश्वस्थ व सेवेकरी उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply