पनवेल ः वार्ताहर
शुभ द ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज, पनवेल होरायझन, खारघर मिडटाऊन व कलंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी गर्भाशयाच्या मुखाचे कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले.
परिसरातील सुकापूर, आसूडगाव, अष्टविनायक हॉस्पिटल खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि नील आशिमा करंजाडे या सर्व ठिकाणी पार पडलेल्या शिबिरात 50 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला. कॉल्पो विजनच्या डॉ. अंजली तळवलकर या तपासणीसाठी त्यांच्या टीमसह येथे आल्या होत्या. या शिबिरात स्तनांमध्ये असलेल्या गाठी, पँप स्मिअर टेस्ट आणि स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली, तसेच प्रत्येक समज गैरसमज आणि कॅन्सर होऊ नये यासाठी घ्यावी लागणारी काळजी यावर डॉ. अंजली यांनी महिलांचे समुपदेशनही केले. रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजचे अध्यक्ष रुपेश यादव, पास्ट प्रेसिडेंट प्रदीप ठाकरे, विजय गोरेगांवकर, एजी मधुकर नाईक, खारघर मिडटाऊनचे अध्यक्ष डॉ. किरण कल्याणकर, कळंबोलीचे अध्यक्ष दिलीप महाडिक, होरिझोनचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी प्राणिल बारटक्के, स्वप्नील गांधी आणि इतर रोटेरियन व अन्स उपस्थित होते. दर महिन्याला एक शिबिर आणि कॅन्सरवरील लसीकरण करण्याचे नियोजन पनवेल, खारघर, कळंबोली आणि इतर आसपासच्या ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यामध्ये असल्याचे रुपेश यादव यांनी सांगितले.