Breaking News

37 हजारांचे दागिने खेचून चोरटे पसार

पनवेल शहर व खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पनवेल ः वार्ताहर

एका महिलेसह एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून अज्ञात चोरटे दुचाकीवरून पसार झाल्याची घटना पनवेल शहर व कोपरा गाव येथे घडली आहे.

पनवेल शहरातील सिझलर हॉटेलसमोरून मनीषा मोर (वय 44) या रस्त्याने पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील 37 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र खेचून पसार झाले. याबाबत घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

दुसर्‍या घटनेत कोपरा गाव सेक्टर 10 परिसरातून समीर ठाकूर हे फेरफटका मारत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एका इसमाने सोन्याची चैन खेचून ते पसार झाले आहेत. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply