Breaking News

परेश ठाकूर : एक यशस्वी नेतृत्व

वपुर्वचन वस्त्राणि विद्या विभव एवंच। वकार पंचहीना न लभन्ते गौरवंंं नरा:॥

समाजात मोठेपणा, मान-सन्मान हवा असेल तर या पाच गुणांपैकी एक गुण आपल्याकडे हवा. आकर्षक रूप किंवा भरदार बांधा अथवा उत्तम व्यक्तिमत्त्व सर्वांचे लक्ष वेधून घेते. वक्तृत्व कलेने लोकांना आपल्याकडे वळवून घेता येते. सुंंंंदर व नीटनेटके कपडे लोकांना मोहवितात. ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ असे तर म्हटलेलेच आहे. हे सर्व गुण पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे आहेत. स्वतःचे कर्तव्य, कष्ट, मेहनत, जिद्द, ध्यास, धाडस तसेच सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे मला यश मिळत गेले, असे ते नेहमी म्हणतात.

आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रशांंंत ठाकूर हे पनवेलचे आमदार आहेत, तर धाकटे सुपुत्र परेश ठाकूर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते आहेत. ठाकूर परिवार म्हणजे समाजाशी नाळ जोडलेल्या व्यक्ती आहेत. कोणीही रात्री-अपरात्री मदतीसाठी बोलावलं तरीही सर्व मंंडळी नेहमीच मदत करण्यास तत्पर असतात.

जगप्रसिध्द लेखक ब्रायन ट्रेसी म्हणतात, उच्चपदस्थ नेत्यांचा सर्वांत महत्त्वाचा गुण म्हणजे संकटकाळात चांंंंगले कार्य करण्याची त्यांची क्षमता. अटळपणे येणारे संकट ते परिणामकारकरित्या हाताळण्याची क्षमता दाखवतात. खरा नेता प्रसंगावधान राखून समस्येचे निराकरण करतो.

रयत शिक्षण संस्थेच्या पनवेलमधील महात्मा फुले आर्टस्, सायन्स व कॉमर्स महाविद्यालयातून नि:स्वार्थी, दक्ष उद्योजक, नेतृत्व करणारे, समाजधुरीण, कार्यक्षम असे विद्यार्थी रायगड जिल्ह्यास लाभले.  या यशस्वी विद्यार्थ्यांपैकी एक आहेत पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर. महाविद्यालयात शिकत असताना माझा व त्यांचा परिचय झाला. प्रत्येक प्राध्यापकाशी ते अत्यंत अदबीने व नम्रतेने वागत असत. संयमी, संवेदनशील, सर्वांना मदत करण्याची व सहकार्य करण्याची वृत्ती, जीवनातील ध्येय निश्चित केलेली व्यक्ती म्हणजे परेश ठाकूर.

प्रा. शोभा डहाळे मंठा यांचा ‘प्रगति आणि जिनविजय’ या पाक्षिक मुखपत्रात लिहिलेला एक लेख वाचनात आला. त्या म्हणतात, मुलांना आपल्या आई-वडिलांकडून मिळणारी मौल्यवान गोष्ट म्हणजे घराण्याचे संस्कार. हे संस्कार घराला भक्कम आधार देतात. त्यावरच कर्तृत्वाचा वृक्ष उभा राहतो हे स्पष्ट करताना त्यांनी एक छोटासा किस्सा सांगितला आहे. वर्गातील एका छोट्या मुलीची लोभस व विनयशील वागणूक पाहून शिक्षकांनी तिला विचारलं, असं नम्रपणे वागायला तुला कोणी शिकवलं? ती म्हणाली कोणीच नाही. आमच्याकडे घरी सगळेच असे वागतात.

सजगता, निर्भिडता, जिवंतपणा, आत्मविश्वास, द़ृढ संकल्प या गुणांमुळे परेश ठाकूर यांचे व्यक्तिमत्व आकर्षक वाटते. त्यांच्या मते मेहनतीला काही पर्याय नसतो. यशस्वी होण्यासाठी तयारी करावी लागते. नशीब नेहमीच प्रयत्न करणार्‍यांच्या पदरात यश टाकते. परेश ठाकूर यांच्या व्यक्तिमत्वात असलेली प्रचंड उर्जा त्यांच्या कामातून, कर्तृत्वातून दिसून येते. पनवेलच्या विकासासाठी त्यांचे विचार, कल्पना, स्वप्नं, योजना, भावना आणि हे सर्व प्रत्यक्षात साकार करण्याची त्यांची क्षमता अभूतपूर्व आहे. अत्यंत सतर्क, सजग, सचेत होऊन प्रत्येक प्रश्नावर विचार करतात. आपल्या कृतीस निश्चित अशी दिशा देतात.  उगाचच रस्ता जातोय म्हणून त्या रस्त्याने चालत राहणे असा त्यांचा स्वभाव नाही, हे त्यांना रुचत नाही.  प्रत्येक काम चांगल्या रितीने करण्याची त्यांची एक पद्धत आहे. त्यांच्यामुळे पनवेलच्या प्रगतीचे, विकासाचे रस्ते मोकळे होत आहेत.

पनवेल-उरण भागातील लोकांची एक उत्सवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भजन, शोभा-यात्रा, पालखी, महाप्रसाद असे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरे होताना आपण पाहतो. श्रीमद्भागवत, श्री ज्ञानेश्वरी, जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंग गाथा, श्री दासबोध इत्यादी ग्रंथांची व्यक्तिगत किंवा सामुदायिक पारायणे होत असतात. या वेगवेगळ्याा कार्यक्रमांच्या पूजेला, उत्सवाला तसेच परिचित-अपरिचित मित्रांच्या वाढदिवसाला, लग्नकार्याला परेश ठाकूर आवर्जून जातात. विविध पुरस्कार समारंभ, संगीताचे कार्यक्रम, वार्षिक स्नेहसंमेलन आदी कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. जगातील विचारवंत म्हणतात, अशा शिष्टाचारांचे पालन यशस्वी पुरुषांचा, नेतृत्व करणार्‍यांचा अत्यंत महत्त्वाचा गुण आहे.

परेश ठाकूर यांचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अत्यंत कौतुकास्पद आणि स्वागतार्ह आहे. पनवेलला आधुनिक महानगरी बनविण्याचा द़ृढ संकल्प युवा नेते परेश ठाकूर यांनी केलेला आहे. विमानतळाच्या निर्मितीमुळे पनवेलचे नाव जगाच्या नकाशावर कोरले जाणार आहे. अगदी बारीकसारीक तपशिलातसुद्धा ते पराकोटीची काळजी व अपार कष्ट घेतात. परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल याची काळजी करतात. अशावेळी खाणे-पिणे, सुटी, विश्रांती सर्व काही विसरून जातात. प्रत्येक काम चांगले करण्यासाठी स्वत:ला झोकून देऊन ते काम मनापासून करणे हा त्यांचा स्वभाव आहे. पनवेलकरांच्या अडचणी सोडवण्याचा आणि आपले ध्येय साध्य करण्याच्या नवनवीन कल्पना, विचार आपल्या सहकार्‍यांना ते सांगत असतात.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा.लि. अर्थात टीआयपीएल कंपनीच्या वतीने कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचार्‍यांंच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा आधार देण्यात आला. याद्वारे टीआयपीएल कंपनीने एक आदर्श पायंडा पाडला आहे. टीआयपीएलमध्ये सुपरवायझर या पदावर काम करणारे विशाल तुकाराम घरत, संजय धर्माजी म्हात्रे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश पनवेल महापालिकेचे सभागृह नेेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मृत कामगारांच्या कुटुंबाला देण्यात आला.

खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्रात कोविड साथ रोग आटोक्यात आल्याने बाह्य रुग्णसेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. विविध वैद्यकीय सेवांचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंटरच्या माध्यमातून कर्करोग रुग्णांसाठी कमी खर्चिक अशा परवडणार्‍या केमोथेरपी केंद्राचे उद्घाटन रोटरी सदस्य परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कोळीवाडा येथील कोळेश्वर विद्यामंदिर शाळेत आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या वतीने लसीकरणाचे आयोजन करण्यात आले.

परेश ठाकूर यांच्या सहकार्याने नवीन पनवेल येथील राजीव गांधी मैदानात पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. कळंबोली येथील उद्यानात विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाढी नदीपात्राची साफसफाई, महापालिका क्षेत्रातील उद्यानांची पाहणी, उद्यानातील लाईट, बेंच, वॉकिंग ट्रॅक, स्वच्छता या गोष्टी करण्यात आल्या. परेश ठाकूर अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने ‘चला करूया वृक्षारोपण’ अभियान हाती घेण्यात आले. कामोठे येथे ई-श्रमकार्ड, हेल्थ कार्ड व सिनियर सिटीझन कार्डचे वाटप परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. खारघर येथील मच्छी मार्केट, भाजी मार्केट त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उभारण्यात येत आहे. अमृत अभियानांतर्गत पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरात सात लाख दशलक्ष लिटर क्षमतेचे नवे जलकुंभ बांधण्यात आले आहे. या जलकुंभाचे उद्घाटन परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

परेश ठाकूर म्हणतात, स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगले काम करुन ‘स्वच्छ पनवेल सुंंंंदर पनवेल’ करण्याच्या द़ृष्टिकोनातून पाऊले उचलण्यास येत आहेत. नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे करीत असताना पनवेलचं पनवेलपणंही जपण्याचा आम्ही प्रयत्न करू.

एखाद्या पर्वतावर, शिखरावर, डोंगरावर कोणी एखादा चढ चढू लागतो तेव्हा केवळ वरती पाहतो. तो केव्हाही, कधीही मागे वळून पाहत नाही. त्याच्याकडे एक संकल्प शक्ती असते. आयुष्याच्या विकासयात्रेला उंची प्राप्त करून देण्याकरिता अशाच द़ृढ संकल्पाची आवश्यकता असते. ही संकल्प शक्ती परेश ठाकूर यांच्याकडे आहे. अशा उच्च कोटीच्या नि:स्वार्थी नेतृत्वामुळे हे जग चालले आहे व चालणार आहे, ते वर्षानुवर्षे टिकणार आहे.

आज परेश ठाकूर यांचा वाढदिवस. त्यांना प्रदीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि उत्तुंग सन्मान प्राप्त होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना!

-प्रा. डॉ. व्ही. एन. रणदिवे, पनवेल, मो. 27469255

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply