Friday , June 9 2023
Breaking News

श्रीरंग बारणेंच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये भव्य रॅली

पनवेल : प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना युवा नेते विश्वजीत बारणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 11) पनवेल शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पनवेल कोळीवाडा येथील जरीमरी मंदिरापासून महायुतीच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत आमदार प्रशांत ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे यांच्यासह महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पटवर्धन, नगरसेवक राजू सोनी, अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका मुग्धा लोंढे, माजी नगरसेवक डी. आर. भोईर, अच्युत मनोरे, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, कल्पना ठाकूर, नीता माळी, प्रमिला कुरघोडे, भाजपचे अमरीश मोकल, शिवसेनेचे रामदास शेवाळे, प्रथमेश सोमण, अनिल कुरघोडे, राहुल गोगटे, बाळा शेट्ये, राजेंद्र भगत, अनिल टेमघरे, अमर पटवर्धन, महादेव दिघे, भारत कल्याणकर, प्रथमेश सोमण, संतोष तळेकर, चिन्मय समेळ, सुनील खळदे, सुहासिनी केकाणे, उज्ज्वला गावडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

या रॅलीचे मतदारांकडून स्वागत करण्यात आले. सुवासिनींनी पंचारती ओवाळून आमदार प्रशांत ठाकूर आणि युवा नेते विश्वजीत बारणे यांचे स्वागत केले. प्रचार फेरी शिवाजी चौकात आल्यावर तवा हॉटेलशेजारी मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे रायगड संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबन पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply