मोहोपाडा : प्रतिनिधी
वासांबे (मोहोपाडा) परिसरातील लोधीवलीवाडी, शिवनगरवाडी, शिदींवाडी, मोहोपाडावाडी, खोंडावाडी आदी भागातील 145 आदिवासी बांधवांना एकात्मिक विकास प्रकल्प, पेण यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे खावटी वाटपाचा कार्यक्रम मोहोपाडा व नवीन पोसरी येथील रास्त भाव धान्य दुकानाच्या आवारात झाला.
या वेळी नवीन पोसरी येथे 36 तर मोहोपाडा रास्त भाव दुकानावर 112 खावटी किट वाटप करण्यात आले. जवळपास दोन हजार रुपयांचे खावटी किट वाटप करण्यात आले. यात मटकी एक किलो, चवली दोन किलो, हरभरा तीन किलो, पांढरा वाटाणा एक किलो, तूरडाळ दोन किलो, मीठ तीन किलो, साखर तीन किलो, गोडेतेल एक लिटर, मिरची पावडर एक किलो, चहापावडर अर्धा किलो आदी वस्तूंचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 2000 हजार रुपये जमा होणार असल्याने लाभार्थ्यांच्या चेहर्यावर समाधानाचे वातावरण या वेळी दिसून आले.