Breaking News

भाजप भटके विमुक्त आघाडीची बैठक

पनवेलमध्ये नवीन पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून आमदार नरेंद्र पवार आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप भटके विमुक्त आघाडीच्या (भविआ) संघटनात्मक नियुक्त्या झाल्या. पनवेलमधील भाजप मध्यवर्ती कार्यालयात शनिवारी (दि. 11) झालेल्या भाजप भटके विमुक्त आघाडीच्या बैठकीत नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

भाजप भविआ महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक गोविंद गुंजाळकर, कोकण विभाग सहसंयोजक भास्कर यमगर, महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुहासिनी केकाणे, कोकण सह संयोजिका उज्वला गलांडे,  जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे (उत्तर रायगड), जिल्हा अध्यक्ष शैलेश काते (दक्षिण रायगड) आणि जिल्हा महिला अध्यक्ष विद्या तामखडे (उत्तर रायगड) यांच्या सहकार्याने भटके विमुक्त आघाडीच्या संघटनात्मक बांधणीचा विस्तार करण्यात आला. या संघटनेला बळकटी देण्यासाठी डॉ. पवनकुमार पवार यांची कोकण सहसंयोजक आणि मिनाक्षी गीते यांची पनवेल शहर मंडल सहसंयोजीका व ज्ञानेश्वर चव्हाण यांची कोकण सहसंयोजक अशी निवड करण्यात आली.

या वेळी भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, भविआ पनवेल ग्रामीण संयोजक जयदत्त सानप, भविआ पनवेल ग्रामीण संयोजिका प्रेमला नारनवर, सुरेश नारनवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply